Muktagiri Waterfall: विकेंडचा प्लान बनला नसेल तर अमरावतीच्या 'या' धबधब्यावर भिजायला जा!

Surabhi Jayashree Jagdish

मुक्तागिरी धबधबा

हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या डोंगराळ भागातील एक सुंदर धबधबा आहे.

पावसाळा

पावसाळ्यात या ठिकाणी वाहणारे धबधबे, हिरवीगार दरी आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.

जैन मंदिरे

मुक्तागिरीध्ये ५२ जैन मंदिरे असून त्यापैकी काही डोंगरावर आणि काही डोंगरकड्याखाली आहेत.

शांतता

धार्मिक स्थळ असल्यामुळे याठिकाणी शांतता आणि अध्यात्मिक वातावरण अनुभवता येतं.

कसं पोहोचाल?

सर्वप्रथम अमरावती शहर गाठा. अमरावतीहून अचलपूरमार्गे चिखलदरा रोडने पुढे जा.

अचलपूर

अचलपूरपासून मुक्तागिरी सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने थेट मुक्तागिरी मंदिर परिसर गाठता येतो. मंदिरापासून धबधबा काही मिनिटांच्या चालीनंतर दिसतो.

मुंबईहून अंतर

मुंबईहून अमरावती सुमारे ६३० ते ६५० किलोमीटर आहे

एकूण अंतर

अमरावतीहून मुक्तागिरी सुमारे ६० किलोमीटर आहे. एकूण अंदाजे ६९० ते ७१० किलोमीटर अंतर तुम्हाला पार करावं लागेल.

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

येथे क्लिक करा