Indigestion Problem: 'ही' लक्षणं दिसली तर समजा अपचन झालंय

Surabhi Jayashree Jagdish

अपचन

आपण खात असलेल्या अन्नाचं नीट पचन झालं नाही की शरीर लगेच काही संकेत देतं. सुरुवातीला ही लक्षणं किरकोळ वाटली तरी दुर्लक्ष केल्यास पोटाचे त्रास वाढू शकतात. अपचन झाल्यावर केवळ पोटच नाही तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसतो.

पोटात जडपणा जाणवणं

जेवण झाल्यानंतर बराच वेळ पोट हलकं न वाटता जड राहते. ढेकर येऊनही आराम मिळत नाही. हे अपचन झाल्याचं एक लक्षण असतं.

पोट फुगणं

अपचनामुळे पोटात गॅस तयार होतो. अशावेळी पोट फुगल्यासारखं दिसू लागतं. यावेळी बसताना किंवा वाकताना अस्वस्थता वाढू लागते.

छातीत जळजळ होणं

पोटातील आम्ल वाढल्यामुळे छातीत जळजळ होऊ लागते. अशावेळी घशात आंबट पाणी येऊ लागतं. विशेषतः मसालेदार किंवा तेलकट जेवणानंतर त्रास वाढतो.

मळमळ किंवा उलटी

अन्न पचलं नाही की व्यक्तीला सतत मळमळ आणि उलटीचा त्रास होतो. यावेळी कधी कधी उलटी झाल्यावर थोडा आराम मिळतो.

पोटदुखी

अपचनामुळे पोटात कळा येऊ शकतात. यावेळी पोटाच्या वरच्या भागात दुखणं जाणवतं. दुखणं सतत किंवा मधूनमधून वाढू शकतं.

जुलाब किंवा बद्धकोष्ठता

अन्न नीट न पचल्याने शौच्याच्या सवयीमध्ये बदल होतात. कधी जुलाब तर कधी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. हे अन्न नीट न पचल्याचे संकेत आहेत.

तोंडाला चव न राहणं

अपचनामुळे भूक लागत नाही. याशिवाय तोंडाला कडू किंवा नकोशी चव येते. यावेळी त्या व्यक्तीला आळशी, थकल्यासारखं वाटू लागतं.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

येथे क्लिक करा