Surabhi Jayashree Jagdish
प्रेमभंग झाल्यानंतर अनेकदा आपल्याला एक्सची आठवण येते. खासकरून रात्रीच्या वेळेस ही आठवण जास्त येते.
जर तुम्हालाही रात्रीच्या वेळी एक्सची आठवण येत असेल तर ती घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या टीप्स सांगणार आहोत.
जर एक्सच्या आठवणी त्रास देत असतील, तर लक्ष दुसरीकडे वळवा. एखादे पुस्तक वाचा, चित्रपट बघा किंवा आवडीचा छंद जोपासा.
अनेकदा आपण नकळत एक्सची प्रोफाइल पाहू लागतो, ज्यामुळे वेदना आणखी वाढतात. यापासून वाचण्यासाठी डिजिटल डिटॉक्स करून बघा.
जर मन जड वाटत असेल तर एखाद्या मित्राशी किंवा कुटुंबातील सदस्याशी बोला. यामुळे मन हलके होईल आणि सकारात्मकता मिळेल.
दुःखापासून पळण्याऐवजी ते स्वीकारा. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, परंतु हळूहळू यातून बाहेर पडणं महत्त्वाचं आहे.
जर तुम्हाला त्यांची आठवण येत असेल, तर ते नातं का तुटलं याची कारणं आठवा. यामुळे पुढे जाण्यास मदत होईल.
दीर्घ श्वास घ्या, ध्यानधारणा करा किंवा रिलॅक्सिंग संगीत ऐका. यामुळे मन शांत राहील आणि निरुपयोगी विचारांपासून बचाव होईल.