ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी अनेकांच्या घरी मनी प्लांट असते.
मात्र कायम असे होते की घरी लावलेले मनी प्लांट सुकून जाते. पाहिजे तशी वाढ या मनी प्लांटची होत नाही.
चला तर जाणून घेऊयात घरी मनी प्लांट लावत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
घरी मनी प्लांट लावताना कायम लक्षात ठेवा की ते एका लहानशा कुंडीत लावावे.
मनी प्लांट लावल्यानंतर त्यात काही प्रमाणात खताचा तुम्ही वापर करु शकता.
मनी प्लांट कुंडीत लावल्यानंतर साधारण २ महिन्यानंतर कुंडीत खत मिस्क करावे.
कधीही मनी प्लांटला जास्त उन्हात ठेवू नये, असे केल्यास पाने जळण्याची शक्यता असते.
मनी प्लांटला दररोज पाणी देऊ नये. अधिक प्रमाणात पाणी दिल्याने मनी प्लांट खराब होऊ शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.