Cancer: महिलांच्या शरीरात हे बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर

संपूर्ण जगातील घातक आजारांमध्ये गणल्या जाणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं. बॉलीवूड सेलिब्रिटींसह सामान्य लोकांमध्येही कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसतंय.

लक्षणं

कॅन्सरमुळे शरीरावर परिणाम होतो आणि आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण होतो. हा आजार शरीरात घर करू लागला की काही लक्षणे दिसू लागतात.

महिलांमध्ये दिसून येणारी लक्षणं

ही लक्षणे दुर्लक्षित करून नये. महिलांमध्येही कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिलांनी काही लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नयेत.

मासिक पाळी अनियमित होणं

मासिक पाळी अनियमित होणं हे कॅन्सरचे संकेत असू शकतात. अनियमित पाळीबरोबरच जास्त रक्तस्राव होणं धोकादायक ठरू शकतं. जर मेनोपॉजनंतरही रक्तस्राव होत असेल तर ते गंभीरपणं घेतलं पाहिजे.

स्तनात गाठ

महिलांच्या स्तनात गाठ किंवा सूज आल्यास ते ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. गाठीबरोबरच स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात बदल दिसू शकतो. स्तनाची त्वचा लाल होणं हे संकेत आहे.

वेदना होणं

शरीरात कोणत्याही कारणाशिवाय वेदना होणं किंवा अशक्तपणा जाणवणं हेही कॅन्सरचं लक्षण असू शकतं. सतत वाढणारा थकवा, कंबर, पोट किंवा हाडांमध्ये वेदना होणं हे लिव्हर किंवा हाडांच्या कॅन्सरचं लक्षण असतं.

वजन अचानक कमी होणं

वजन अचानक कमी होणं हेही कॅन्सरचं लक्षण असू शकतं. काहीही न करता वजन घटणं हे पॅन्क्रियाज, पोट किंवा फुफ्फुसांच्या कॅन्सरचं लक्षणं असू शकतं.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा