Breast cancer: शरीरात ही 8 लक्षणं दिसली तर समजा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार होऊ शकतात. यासाठी या कॅन्सरची लक्षणं समजून घेतली पाहिजे.

Breast health

स्तनात गाठ

स्तनात किंवा बगलजवळ एखादी छोटी गाठ, जाडी किंवा कडकपणा जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नये. सुरुवातीच्या टप्प्यातील गाठी बहुतेक वेळा वेदनारहित असतात. त्या सामान्य ऊतींपेक्षा वेगळ्या वाटू शकतात.

Inflammatory breast cancer

स्तनाच्या आकारात बदल

एका स्तनाचा आकार अचानक बदलणे, सूज येणं किंवा दोन्ही स्तनांमध्ये असमानता निर्माण होणं हे धोक्याचे संकेत असू शकतात. स्तनाचा आकार किंवा स्वरूप बदलल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Breast skin changes

त्वचेतील बदल

स्तनावरील त्वचा सुरकुतलेली दिसणं, खड्डे पडल्यासारखी वाटणं, लालसरपणा किंवा पुरळ येणं ही लक्षणं कॅन्सरशी संबंधित असू शकतात. विशेषतः त्वचा संत्र्याच्या सालीसारखी जाड आणि खडबडीत दिसत असेल तर ते इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. हा कॅन्सर दुर्मिळ असला तरी अतिशय आक्रमक मानला जातो.

Health checkup

निप्पलमधून स्त्राव होणं

स्तनपानाशी संबंध नसताना निप्पलमधून पारदर्शक किंवा रक्तासारखं द्रव बाहेर येत असेल तर त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. निप्पलमध्ये होणारे अगदी छोटे बदलही गंभीर आजाराचं संकेत देऊ शकतात.

Preventive healthcare

निप्पलमध्ये वेदना

एखादा निप्पल अचानक आत ओढला गेल्यासारखा दिसत असेल किंवा सतत वेदना होत हेही धोक्याचं लक्षण असू शकतं. विशेषतः हा बदल एका बाजूला दिसत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.

Women medical care

बगलेत सूज येणं

बगलेतील लिम्फ नोड्स सुजणं हे देखील स्तनाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. काही वेळा स्तनात गाठ नसतानाही बगलेत सूज दिसून येते.

Breast skin changes

त्वचा लाल होणं

स्तनाची त्वचा गरम वाटणं, सूज येणं किंवा लाल झाल्यासारखी दिसणं ही इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. हा प्रकार वेगाने पसरत असल्याने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Breast examination

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा