Blocked arteries signs: शरीरात ही ५ लक्षणं दिसली तर समजा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचलीये

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट ब्लॉकेज

हार्ट ब्लॉकेज प्रामुख्याने कोरोनरी आर्टरीजमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साचल्यामुळे होतं. या साचलेल्या थराला प्लाक म्हणतात. कालांतराने हा प्लाक वाढत जातो आणि रक्तप्रवाह कमी होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Coronary artery disease

प्लाक जमा होणं

रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक जमा झाल्यानंतर हृदयाच्या नसा ब्लॉक होतात.यावेळी छातीत हलका दाब, जडपणा किंवा दडपण जाणवत असेल तर ते अँजायनाचं लक्षण असू शकतं. विश्रांती घेतल्यानंतर हा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे.

Chest pressure symptoms

श्वास घेताना त्रास होणं

दोन मजले चढल्यानंतर किंवा साधं बोलतानाही श्वास लागणं हे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नसल्याचे संकेत असू शकतात. ही समस्या अचानक किंवा हळूहळू वाढू शकते.

Heart attack warning signs

सतत थकवा जाणवणं

पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल तर ते हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा झाल्याचं लक्षण असू शकतं. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यामुळे हृदयाला शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अधिक प्रमाणात थकवा जाणवतो.

Plaque buildup in arteries

जबडा, खांदा किंवा पाठीत वेदना

दात घासल्यानंतर जबड्यात वेदना होणं, खांद्यात कळ येणं किंवा कोणतीही दुखापत नसताना पाठ दुखणं हीदेखील हृदयातील समस्येची लक्षणं असू शकतात. काही रुग्णांमध्ये जबडा किंवा पाठदुखी हेच एकमेव लक्षण दिसून येतं.

Shortness of breath causes

थंड घाम येणं

मळमळ होणं, अपचनासारखी भावना निर्माण होणं किंवा अचानक थंड घाम येणं हे देखील हृदयावर ताण येत असल्याचं लक्षण असू शकतं. अनेकदा ही लक्षणं छातीतील वेदनेसोबत दिसून येतात. आराम करत असतानाही घाम येत असल्यास डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी.

Heart health awareness

हृदयाचे ठोके अनियमित जाणवणं

हृदयाचे ठोके चुकल्यासारखं वाटणं, धडधड वाढणं किंवा छातीत वेदना जाणवणं याला हार्ट पल्पिटेशन म्हणतात. जर ही समस्या थकवा किंवा अशक्तपणासोबत दिसत असेल तर ईसीजीसह आवश्यक तपासण्या करून घेणं गरजेचं आहे.

Angina symptoms

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

येथे क्लिक करा