High cholesterol: चेहऱ्यावर ही ३ लक्षणं दिसली तर समजा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झालीये

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल

आजकाल बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिसून येते. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यावर त्याचा परिणाम हृदयासोबत त्वचा आणि चेहऱ्यावरही दिसू लागतो. ही लक्षणं नेमकी काय आहेत ती पाहूयात.

Cholesterol symptoms

डोळ्यांच्या आसपास पिवळसर गाठी

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डोळ्यांच्या पापण्यांच्या आसपास पिवळसर किंवा फिकट रंगाच्या छोट्या गाठी दिसू शकतात. या गाठींना वैद्यकीय भाषेत झॅन्थेलॅझ्मा असं म्हटलं जातं. शरीरात फॅट्स जास्त झाले की हे लक्षण दिसून येतं.

LDL cholesterol

चेहऱ्यावर थकवा

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि त्यामुळे चेहरा थकलेला दिसू शकतो. काही लोकांच्या चेहऱ्यावर सूज दिसून येते. हे लक्षण सतत दिसत असल्यास कोलेस्ट्रॉल तपासणी करणं गरजेचं आहे.

Xanthelasma

त्वचेवर तेलकटपणा

शरीरातील फॅटचे प्रमाण वाढल्यावर त्वचा अधिक तेलकट होऊ शकते. चेहऱ्यावर छोटे पिवळसर पुरळ किंवा दाण्यासारखे उठाव दिसू शकतात. हे बदल शरीरातील लिपिडचं प्रमाण वाढल्याचे संकेत मानले जातात.

Facial signs of cholesterol

आहारात बदल

तळलेले पदार्थ, जंक फूड आणि जास्त तेलकट अन्न कमी खाणं आवश्यक आहे. आहारात फळं, भाज्या, ओट्स आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. योग्य आहारामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते.

Yellow bumps near eyes

नियमित व्यायाम

दररोज किमान ३० मिनिटं चालणं, योगा किंवा हलका व्यायाम करणं फायदेशीर आहे. व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदय निरोगी राहतं.

Healthy lifestyle

धूम्रपान टाळा

धूम्रपान आणि मद्यपानामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक असतो. सततचा तणावही शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करून कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो. पुरेशी झोप, शांत मन आणि चांगली जीवनशैली यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकते.

High cholesterol treatment

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा