Heart Attack Symptom: पुरूषांना हे 1 लक्षण दिसलं तर समजा हार्ट अटॅक येणारे

Surabhi Jayashree Jagdish

हृदयाच्या धमन्या ब्लॉक होणं

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साचल्यामुळे ब्लॉकेज तयार होऊ शकते. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. ब्लॉकेज पूर्णपणे झाल्यास हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

Coronary Artery Disease | saam tv

उच्च रक्तदाब

सतत उच्च रक्तदाब राहिल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊन त्यामध्ये ब्लॉकेज तयार होण्याची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब नियंत्रणात न ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढू शकतो.

Early Signs of Heart Attack | saam tv

उच्च रक्तदाब

सतत उच्च रक्तदाब राहिल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊन त्यामध्ये ब्लॉकेज तयार होण्याची शक्यता वाढते. उच्च रक्तदाब नियंत्रणात न ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढू शकतो.

High Cholesterol | saam tv

मधुमेह आणि लठ्ठपणा

मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जास्त वजन, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून धमन्यांमध्ये चरबी साचू शकतं. या सर्व घटकांमुळे हार्ट अटॅक होण्याची शक्यता अधिक असते.

Heart Health | saam tv

ताणतणाव

सततचा मानसिक ताण, अपुरी झोप आणि अस्वस्थ जीवनशैली हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. कुटुंबात आई-वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना लहान वयात हार्ट अटॅकचा इतिहास असल्यास धोका वाढू शकतो.

Heart Disease Risk Factors | saam tv

छातीत वेदना

हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य आणि पहिलं लक्षण म्हणजे छातीत तीव्र वेदना, दडपण, जडपणा वाटणं. ही वेदना सामान्य स्नायूंच्या दुखण्यापेक्षा वेगळी असते आणि काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. अशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.

Diabetes and Heart Disease | saam tv

वेदना इतर भागांमध्ये पसरणं

हार्ट अटॅकपूर्वी छातीत सुरू झालेली वेदना डावा हात, खांदा, पाठ, मान, जबडा किंवा दातांपर्यंत पसरू शकते. काही रुग्णांमध्ये ही वेदना सौम्य असते तर काहींमध्ये ती तीव्र स्वरूपाची असू शकते. अशा प्रकारची वेदना जाणवल्यास ती दुर्लक्षित न करता त्वरित रुग्णालयात जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Obesity and Heart Attack | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

Heart Attack Warning | saam tv
येथे क्लिक करा