Coronary Artery Disease: हृदयाच्या नसा कमकुवत झाल्यास पायांमध्ये दिसतात ही २ मोठी लक्षणं

Surabhi Jayashree Jagdish

कोरोनरी आर्टरीज

कोरोनरी आर्टरीज कमकुवत होणं किंवा त्यामध्ये अडथळे निर्माण होणं ही गंभीर आरोग्य समस्या आहे. अशा वेळी हृदय शरीरात पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नाही, त्यामुळे काही लक्षणं पायांमध्येही दिसून येतात. ही लक्षणं अनेकदा दुर्लक्षित केली जातात, परंतु ती हार्टच्या समस्यांचा इशारा असू शकतात.

Heart Health | saam tv

हृदयाचे सामान्य आजार

कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक आणि हृदय निकामी होणं या समस्या दिसून येतात. या आजारांमुळे हृदयाच्या रक्तपुरवठ्यावर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं ओळखून उपचार घेतल्यास गंभीर धोका टाळता येतो.

Leg Swelling | saam tv

पायांमध्ये सूज येणं

हृदयाच्या नसा कमकुवत झाल्यावर शरीरातील रक्त आणि द्रवपदार्थ योग्य प्रकारे पंप होत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त द्रव पाय, घोटे आणि तळपायांमध्ये साचू लागतो. पायांमध्ये सतत किंवा वारंवार सूज येत येऊ लागते.

Swollen Feet | saam tv

चालताना गोळे येणे

हृदयाशी संबंधित रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास पायांपर्यंत पुरेसा रक्तपुरवठा पोहोचत नाही. त्यामुळे चालताना पाय दुखणं, जड वाटणं किंवा गोळे येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. विश्रांती घेतल्यानंतर ही वेदना कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Poor Blood Circulation | saam tv

हृदयाच्या नसा कमजोर का होतात?

उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ शकते. धूम्रपान, तणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही रक्तवाहिन्या कमजोर होऊ लागतात.

Heart Attack Symptoms | saam tv

ही समस्या कशी टाळावी?

दररोज किमान 30 मिनिटं चालणं किंवा व्यायाम करणं हृदयासाठी फायदेशीर ठरतं. धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल यांची नियमित तपासणी केल्याने धोका कमी करता येतो.

Heart Warning Signs | saam tv

हृदयासाठी आहार कसा असावा?

आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि कडधान्यांचा समावेश करावा. तूप, लोणी, तळलेले पदार्थ आणि जास्त मीठ असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. ओमेगा-3 फॅटी अॅसिड असलेले मासे, अक्रोड आणि जवस यांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.

High Blood Pressure | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart attack warning signs | saam tv
येथे क्लिक करा