Manasvi Choudhary
तुरीची डाळ वापरून साऊथ इंडियन स्टाईल सांबर केल्यास चवीष्ट लागतो. सांबर घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
सांबर बनवण्यासाठी तुरीची डाळ, शेवग्याची शेंग, लाल भोपळा, वांगी, गाजर, कांदा, टोमॅटो, चिंच रस, गूळ, मसाला, तेल, मोहरी, लाल मिरच्या, कढीपत्ता पाने, हिंग हे साहित्य घ्या.
सांबर बनवण्यासाठी सर्वातआधी तुरीची डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घ्या. डाळ शिजल्यानंतर तिचे मिश्रण चांगले घोटून घ्या.
गॅसवर एका पातेल्यात गरम तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून त्यामध्ये सर्व भाज्या मिक्स करा आणि चांगल्या शिजवून घ्या
भाज्या शिजल्या की या मिश्रणामध्ये मसाला, सांबर मसाला, मीठ आणि चिंच रस घालून संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करा.
आता या मिश्रणात शिजलेली डाळ मिक्स करा आणि थोडेसे पाणी घाला आणि सांबर चांगला शिजवून घ्या.
गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता याची फोडणी द्या आणि त्यावर तयार सांबर मिक्स करा
अशाप्रकारे घरच्या घरी तुरीच्या डाळीचा सांबर तयार होईल .