Bharat Jadhav
हातावरील रेषा जसं भविष्य वर्तवत असतात, त्याचप्रमाणे व्यक्तीचे हस्ताक्षर हे त्या व्यक्तीचे व्यक्तमत्व सांगत असते.
जर हस्ताक्षराचे बिंदू तीक्ष्ण असतील तर याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती स्वतःचं ऐकणारी आहे. कोणालाही त्याच्यासमोर बोलू देत नाही.
सरळ हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीचा स्वभाव शांत आणि गंभीर असतो. कालांतराने अशा लोकांचे बरेचसे निर्णय योग्य ठरतात.
जे व्यक्ती हस्ताक्षर लहान आकाराचे असते त्या व्यक्तीची तर्कशक्ती ही चांगली असते.
अक्षर लिहिताना जे व्यक्ती अक्षराचा खालचा भाग मोठा काढतात त्या खर्चिक आणि भौतिकवादी असतात. म्हणजेच त्या दुसऱ्या गोष्टींवर अधिक पैसा खर्च करतात.
जर एखादा व्यक्ती लिहिताना अक्षरे आणि रेषा अगदी जवळ काढत असेल तर त्या व्यक्तीला काम करण्याची घाई असते.
लिहिताना शब्द आणि ओळींमधील अंतर समान असेल तर व्यक्तीचे वर्तन संतुलित राहते.
जो व्यक्ती लिहिताना हस्ताक्षरातील अक्षरे दूर दूर ठेवून लिहित असेल तर तो व्यक्ती आपल्या भावना कोणाकडेही सहजपणे व्यक्त करत नाही.
येथे क्लिक करा