Bharat Jadhav
धन्याचे पाणी पचनासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढते.
वजन कमी करण्यासाठी धन्याचे पाणी हा स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.
जडपणा दूर करते
मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर छातीत जडपणा किंवा फुगल्यासारखे वाटत असल्यास, दिवसातून २-३ वेळा धन्याचे पाणी प्यावे.
सकाळी रिकाम्या पोटी धन्याचे पाणी प्यायल्याने थायरॉईडपासून आराम मिळतो. धन्याच्या बिया आणि पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे थायरॉईडच्या समस्यांपासून आराम देतात.
रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी धन्याचे पाणी प्रभावी आहे.
धन्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई सारखे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे दृष्टी सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे पाणी रोज पिणं चांगले असते.
कढईत १ टेबलस्पून धने त्यात २ कप पाणी घाला. साधारण ५ मिनिटे ते पाणी उकळून घ्या. थंड झाल्यावर ते पाणी गाळून घ्या. आणि कोमट झाल्यानंतर ते पाणी प्या.
१४ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांनी एका दिवसात फक्त १५ मिलीग्राम धने खावे.
हेही वाचा
येथे क्लिक करा