Saam Tv
दिवाळी म्हंटल की साखर, रवा, गुळ, खोबरे आणि खवा. हे महत्वाचे पदार्थ आपण विकत घेता.
आपण दिवाळीला काही फराळ तयार करतो. त्यात आपण खवा जास्त प्रमाणात वापरतो.
मात्र तुम्ही विकत आणलेला खवा हा खरा आणि ताजा आहे की, भेसळयुक्त हे तुम्हाला जाणून घेणे महत्वाचे आहे.
जर भेसळयुक्त किंवा खराब झालेला खवा असेल तर, तुमचे फराळ व्यवस्थीत तयार होणार नाही.
भेसळयुक्त खव्याचा वापर केल्याने तुमचे फराळ लवकरात लवकर खराब होईल.
तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीने भेसळयुक्त खवा ओळखू शकता.
तुम्ही खवा घेताना आधी त्याचा वास घ्या. तुम्हाला दुधाचा वास येत असेल तर तो खवा चांगला आहे.
भेसळयुक्त खवा असा असतो
तुम्ही खव्याच्या वास घेतला आणि त्याला जर वासचं नसेल तर तो खवा भेसळयुक्त असतो. त्याने तुमच्या हेल्थवर परिणाम होवू शकतो.
दुसरी सोप्पी पद्धत म्हणजे खवा पाण्यात धुवा. ते पाणी जर घट्ट झाले तर तुमचा खवा चांगला आहे.
तुम्ही पाण्यात टाकलेला खवा जर चिकट झाला तर तो भेसळयुक्त खवा आहे.
NEXT : दिवाळीपुर्वी घरातून बाहेर काढा 'या' वस्तू; लक्ष्मी होईल प्रसन्न