Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी आणि तंदुरूस्तीसाठी केवळ वजन योग्य असणे महत्वाचे नाही तर तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन योग्य असणे महत्वाचे आहे.
अनेकांना असे वाटते की, बारीक असणे म्हणजे निरोगी असणे किंवा जाड असणे म्हणजे लठ्ठपणा, पण शरीराचे आरोग्य ठरवण्यासाठी उंची आणि वजनाचे योग्य समतोल असणे अत्यंत महत्वाचे आहे.
जर तुमची उंची ५ फूट दरम्यान असेल तर तुमचे वजन ४४ ते ५६ किलो दरम्यान असावे.
जर तुमची उंची ५ फूट ३ इंच असेल तर वजन: ४९ ते ६३ किलो दरम्यान असावे. ५ फूट ५ इंच उंची असणाऱ्यांचे वजन ५३ ते ६७ किलो दरम्यान असावे.
५ फूट ७ इंच उंची असेल तर तुमचे वजन ५६ ते ७२ किलो दरम्यान असावे. ५ फूट १० इंच उंची असेल तर तुमचे वजन ६१ ते ७८ किलो दरम्यान असावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या. हे प्रमाण वय, शारीरिक रचना आणि जनुकांवर थोडेफार मागे-पुढे असू शकते.