Shruti Vilas Kadam
१ कप थंड दूध, १ टीस्पून कॉफी पावडर, २-३ टीस्पून साखर, २ स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम, बर्फाचे तुकडे आणि चॉकलेट सिरप (ऐच्छिक).
एका भांड्यात थोड्या कोमट पाण्यात कॉफी पावडर आणि साखर चांगले विरघळून घ्या.
मिक्सर जारमध्ये थंड दूध, तयार केलेले कॉफी मिक्स, बर्फाचे तुकडे आणि १ स्कूप आईस्क्रीम घाला.
सर्व मिश्रण छान फेसाळ आणि स्मूथ होईपर्यंत ३०-४० सेकंद ब्लेंड करा.
ग्लासच्या आतून चॉकलेट सिरप घालून सजवा, त्यामुळे चव आणि लूक दोन्ही छान येतो.
तयार कोल्ड कॉफी ग्लासमध्ये ओता आणि वरून उरलेला आईस्क्रीम स्कूप ठेवा.
वरून चॉकलेट शेविंग्स किंवा कॉफी पावडर शिंपडा आणि लगेच थंडगार सर्व्ह करा.