Shreya Maskar
अनेकदा आपण गाढ झोपलेले असतो मात्र अचानक आपल्याला पडल्यासारखे वाटतो आणि आपण दचकून उठतो, यामागचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.
खाली पडल्यासारखी वाटणारी ती अचानकची भावना म्हणजे 'हिप्निक जर्क' (hypnic jerk) किंवा 'स्लीप स्टार्ट' (sleep start) म्हणून ओळखली जाणारी स्नायूंची एक निरुपद्रवी हालचाल (स्नायूंचा झटका) आहे.
जेव्हा तुम्हाला झोप येऊ लागते, तेव्हा तुमचे स्नायू शिथिल होतात. या शिथिलतेचा अर्थ 'आपण खाली पडत आहोत' असा तुमचा मेंदू चुकीचा लावू शकतो.
अशा वेळी तुमचा मेंदू दचकतो आणि स्वतःला सावरण्यासाठी स्नायू ताठ करण्याकरिता शरीराला अचानक एक झटका देतो.
तणाव, कॅफिनचे अतिसेवन, अपुरी झोप किंवा रात्री उशिरा केलेला व्यायाम यांमुळे देखील तुम्ही झोपेत अचानक पडल्यासारखं वाटते.
झोपेत असे होऊ नये म्हणून कॅफिनचे सेवन कमी करा. संध्याकाळचे एनर्जी ड्रिंक्स घेणे टाळा. रात्री झोपण्यापूर्वी हेल्दी पदार्थ खा.
टेन्शन मानसिक आरोग्याचा मोठा शत्रू आहे. टेन्शन कमी घ्या. रात्री झोपण्याआधी तणाव घेऊ नका. दररोज रात्री एकाच वेळी झोपायला जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.