Rajma vs Chole Rice : राजमा-भात की छोले-भात? जास्त प्रोटीन कुठून मिळतं, आजपासून डाएटमध्ये करा समावेश

Shreya Maskar

राजमा की छोले

राजमा आणि छोले दोन्ही भातासोबत खूर स्वादिष्ट लागतात. राजमा-भात आणि छोले-भात अनेकांच्या घरी नेहमी बनवला जातो. यात भरपूर पोषण देखील असते.

Rajma or chickpeas | pinterest

शिजवलेले कडधान्य

राजमा आणि छोले दोन्ही शिजवताना पाणी शोषून घेतात. ते पाण्यात पूर्णपणे भिजवले जातात, ज्यामुळे त्यांचे वजन आणि आकार वाढतो, यामुळे त्यांच्यातील प्रथिनांचे प्रमाण बदलते.

Cooked pulses | pinterest

आरोग्य तज्ज्ञ

राजमा आणि छोले सारख्याच प्रमाणात प्रथिने देतात, प्रत्येक शिजवलेल्या कपमध्ये अंदाजे 14 ते 15 ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे मर्यादित स्वरुपात दोघांचेही सेवन करणे आरोग्यास फायदेशीर ठरते.

Health expert | pinterest

राजमा खाताना कोणती काळजी घ्यावी?

कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या राजमामध्ये फायटोहेमॅग्लुटिनिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे उलट्या, मळमळ आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, राजमा अर्धवट शिजवणे किंवा कच्चा खाणे टाळा. खाण्यापूर्वी तो पूर्णपणे शिजवून मऊ केला पाहिजे.

Rajma | pinterest

छोले खाताना कोणती काळजी घ्यावी?

छोले या पदार्थात ऑलिगोसॅकराइड नावाची शर्करा आणि फायटेट्स सारखी अँटीन्यूट्रिएंट्स असतात, जी पोटाला जड होऊ शकतात.

Chole Rice | pinterest

छोले-भाताचे फायदे

छोले हे देखील प्रोटीन आणि फायबरचे चांगले वनस्पतीजन्य स्रोत आहेत. छोले-भातासोबत भाज्या किंवा कोशिंबीर घेतल्यास जेवणातील फायबर आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स वाढतात.

Chole | pinterest

राजमा-भाताचे फायदे

राजम्यात वनस्पतीजन्य प्रोटीन आणि फायबर मिळते. भातासोबत खाल्ल्याने कडधान्य आणि धान्य यांचे पोषण एकत्र येते. कांदा, टोमॅटो, भाज्या किंवा कोशिंबीरसोबत राजमा-भात घेतल्यास जेवण अधिक संतुलित करता येते.

Rajma | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Kidney Stones | AI PHOTO
येथे क्लिक करा...