ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा 'सायलेंट किलर' मानला जातो. कारण उच्च रक्तदाबाने ग्रस्त बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नसते.
जर हा आजार बराच काळ राहिला तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह हृदयाशी संबंधित अनेक घातक आजारांचा धोका वाढतो.
त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं खूप महत्वाचे आहे.
अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की शेवटी रक्तदाबाची पातळी कोणती आहे ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
आरोग्य तज्ञांच्या मते, जर रक्तदाब १४०/९० मिमीएचजी किंवा त्याहून अधिक झाला तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
रक्तदाबाच्या रुग्णांनी वेळोवेळी स्वतःची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे.
वारंवार लघवी होणे, डोळे लाल होणं, छातीत दुखणे, चेहरा लाल होणे, जास्त घाम येणे, अंधुक दृष्टी ही याची लक्षणं दिसून येतात