Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात भेट दिल्यानंतर मनाला थंडावा वाटेल.
हैदराबादमध्ये उन्हाळ्याच्या सुटीत फिरण्यासाठी तुम्ही खालील 5 ठिकाणांना भेट देऊ शकता.
हैदराबादपासून २ तासाच्या अंतरावर अंनतगिरी हिल्स हे सुंदर ठिकाण आहे. येथे प्रवेश विनामूल्य आहे. हे ठिकाण मूसिनदीचे उगम स्थान मानले जाते.
हिरव्या निसर्गमय परिसरात तुम्ही या ठिकाणाला भेट दिल्यास तुम्ही शांतता अनुभवायला मिळेल.
धकाधकीच्या जीवनातून शांतता हवी असेल तर तुम्ही शमीरपेट झील या ठिकाणी जाऊ शकता. शमीरपेट झील च्या किनाऱ्यावर थंड हवेचा आनंद घ्या.
जुबली हिल्स हे कपल्ससाठी बेस्ट आहे. येथे गेल्यानंतर तुम्हाला पार्टनरसोबत चांगला वेळ घालवता येईल.
जुबली हिल्सच्या जवळ तुम्ही केबीआर नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. लहान मुलांसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. अनेक प्रेमीयुगुल आणि फिटनेस व्यायाम करण्यासाठी पर्यटक येथे येतात.
गंडीपेट पार्क हे हैदराबादमधील आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे. उन्हाळ्यात खास फॅमिली पिकनीक तुम्ही या ठिकाणी काढू शकता.