Manasvi Choudhary
लग्नानंतर सुरूवातीला काही वर्षे नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम, संवाद,आपुलकी हे सर्व व्यवस्थित सुरू असतं. मात्र नातं जसं जुने होते तश्या या सवयी कमी होतात असं तुम्ही देखील ऐकलंच असेल.
दिवसभराच्या धावपळीनंतर जेव्हा पती-पत्नी एकत्र वेळ घालवण्यासाठी बेडरुममध्ये जातात, तेव्हा तो वेळ एकमेकांसाठी खास असतो. मात्र, बऱ्याचदा नकळत केलेल्या काही छोट्या चुकांमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.त्या सवयी कोणत्या हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
बऱ्याचदा दिवसभर कामानिमित्त बाहेर राहिल्यानंतर घरी आल्यावरही पुरुष रात्री बेडवर गेल्यावर सोशल मीडिया किंवा ऑफिसच्या मेसेजमध्ये बिझी असतात. बायकोच्या समोर सतत फोनमध्ये बिझी असणे ही सवय त्यांना आवडत नाही.
बेडरुम हा केवळ आरामाची जागा नाही, तर दिवसभर काय झाले? संपूर्ण दिवस कसा गेला? याविषयी तुम्ही एकमेकांशी चर्चा केली पाहिजे. मात्र अनेकदा पती कोणत्याही चर्चा न करता शांतपणे झोपतो. ही वाईट सवय महिलांना आवडत नाही.
बेडरुममध्ये असताना अनेक पुरूष फोनवर तासनतास मित्रांशी किंवा इतरांशी गप्पा मारत असतात. ही सवय महिलांना बिलकूल आवडत नाही.
अनेक पुरूषांना हे मला दे, ते मला दे अशी कामांची ऑर्डर सोडण्याची सवय असते. मात्र यामुळे नात्यावर परिणाम होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.