Manasvi Choudhary
मंगळसूत्र हे महिलांच्या सौंभाग्याचं लेणं मानलं जातं. लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात.
आजकाल मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत. सिंपल टू मॉडर्न लूकसाठी तुम्ही मंगळसूत्राचे नवीन पॅटर्न्स निवडू शकता.
कर्सिव्ह अक्षरात नावाचे पेडंट हा सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. यात पतीचे नाव इंग्रजी कर्सिव्ह अक्षरात लिहिले जाते. हे दिसायला अत्यंत नाजूक आणि स्टायलिश असते.
जर तुम्हाला पारंपारिक लूक आवडत असेल, तर मराठी किंवा देवनागरी लिपीत नाव लिहिलेले मंगळसूत्र सुंदर दिसते.
ज्यांना पूर्ण नाव लिहायला आवडत नाही, त्यांच्यासाठी पतीच्या नावाचे पहिले अक्षर तुम्ही पेडंटसाठी निवडू शकता.
इन्फिनिटी चिन्हाच्या मध्ये पतीचे नाव गुंफलेले हे डिझाईन तुम्ही निवडू शकता हे युनिक मंगळसूत्र पॅटर्न आहे.
पतीच्या नावाच्या अक्षरासोबत गणपतीचा आकार किंवा ओम देखील लिहतात हे डिझाईन धार्मिक श्रद्धेसोबतच स्टायलिशही दिसते.