Husband Health : नवरोबाच्या आरोग्याची किल्ली बायकोच्या हाती, 'हे' ५ नियम पाळायलाच हवेत

Shreya Maskar

नवऱ्याचे आरोग्य

नवरा कुटुंबासाठी खूप कष्ट करतो, पण त्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याला तंदुरुस्त आणि आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक पत्नीला माहित असाव्यात अशा ५ सोप्या गोष्टी जाणून घ्या.

Husband health | pinterest

संतुलित आहार

नवऱ्याच्या जेवणात अंडी, मासे, चिकन, पनीर आणि डाळ यांसारख्या प्रथिने भरपूर प्रमाणात द्या. ज्यामुळे स्नायू तयार होतात आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

balanced diet | pinterest

लाइफस्टाइल

बैठी दिनचर्या टाळण्यासाठी आणि एकंदर तंदुरुस्ती सुधारण्यासाठी कामानंतर थोडे चालणे किंवा हालचाल करण्यास सांगा. दोघे एकत्र नाइट वॉकला जा.

Lifestyle | pinterest

झोप

नवऱ्याची नियमित रात्री 7-9 तासांची झोप होईल, याची काळजी घ्या. झोपायच्या आधी फोन, टीव्ही दूर ठेवायला सांगा. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या उद्भवणार नाही.

sleep | pinterest

हृदयाचे आरोग्य सुधारते

पुरेशी आणि चांगली झोप हृदयाचे आरोग्य सुधारते, मेंदूची कार्यक्षमता वाढवते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. सक्रिय राहण्यासाठी प्रत्येकालाच योग्य झोपेची गरज असते.

Improves heart health | pinterest

संवाद साधा

पत्नीच्या प्रेमळ शब्दांनी पुरुष अनेकदा आपल्या चिंता विसरून जातात. तुम्हाला त्यांच्या समस्या सोडवण्याची गरज नाही; फक्त संयमाने आणि शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, ज्यामुळे त्यांचा मानसिक ताण कमी होईल.

Communicate | pinterest

औषधे- डॉक्टरांच्या तपासण्या

तुमच्या नवऱ्याच्या औषधांच्या वेळा पाळा. कामाच्या गडबडीत ते विसरले जाते. तसेच वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

Medicines | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : नवरोबाला नेमके काय हवे असते? बायकोकडून 'ही' ५ गुपिते लपवून ठेवतात पती; वाचून थक्क व्हाल

Marriage Tips
येथे क्लिक करा...