Siddhi Hande
१०वी-१२वीच्या बोर्डाच्या परीक्षा मार्च महिन्यात झाल्या आहेत.
१२वीच्या परीक्षा होऊन दीड महिना झाला आहे.
दरम्यान, आता १२वीचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
१२वीच्या निकालाची संभाव्य तारीख १५ मे असल्याचे सांगितले जात आहे.
१२वीच्या निकालाची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठड्यात कधीही निकाल लागू शकतो.
१२वीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असते. त्यानंतर आयुष्यात कोणता करिअर ऑप्शन निवडायचा हे ठरवता येते.
बारावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच १० दिवसांत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
दहावी- बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच कॉलेजच्या अॅडमिशनची प्रक्रिया सुरु होते.