Sakshi Sunil Jadhav
बॉलिवूडच्या ह्रतिक रोशनचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य अनेकदा चर्चेत असते.
आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चर्चेत त्याची प्रॉपर्टी लक्ष वेधत आहे.
अभिनेता हृतिक रोशनने मुंबईतील जुहू येथे असलेल्या समुद्राजवळील आलिशान फ्लॅट त्याच्या गर्लफेंजला म्हणजेच सबा आझादला दिला आहे.
हृतिक रोशनने हा फ्लॅट त्याच्या प्रेयसीला दिला असला तरी त्याने तो भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे.
आलिशान घराच्या भाड्याची किंमत ही ७५,००० रुपये दरमहा असणार आहे.
हृतिक रोशनचे हे अपार्टमेंट त्या शहरातल्या सगळ्यात महागड्या परिसरात आहे.
जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील मन्नत अपार्टमेंट्समध्ये असलेली घरं ही १००० चौरस फूटाची असतात. जी १ लाख ते २ लाख रुपयांना विकली जातात.