Mughal harem: मुघल हरममध्ये महिलांची निवड कशी केली जात होती?

Surabhi Jayashree Jagdish

मुघल हरम

भारतात मुघल साम्राज्याच्या काळात हरम ही केवळ राजाच्या पत्नींची जागा नव्हती, तर ती अत्यंत संरक्षित आणि नियमबद्ध व्यवस्था मानली जात होती. हरममध्ये बेगम, दासी, नर्तिका, सेविका आणि राजघराण्यातील अनेक महिलांचा समावेश असायचा.

Mughal Empire

राजकीय विवाहांमधून हरममध्ये प्रवेश

मुघल बादशाह अनेकदा राजपूत आणि इतर राजघराण्यांशी राजकीय संबंध मजबूत करण्यासाठी विवाह करत असत. अशा विवाहांमधून आलेल्या स्त्रियांना हरममध्ये विशेष दर्जा दिला जात होता.

Royal harem

युद्धातील कैद्यांमधून महिलांची निवड

काही वेळा युद्ध जिंकल्यानंतर पराभूत राज्यांतील महिलांना बंदी बनवून मुघल दरबारात आणले जात असे. या महिलांना दासी किंवा सेविका म्हणून हरममध्ये ठेवले जाई. मात्र सर्व महिलांना जबरदस्तीने हरममध्ये टाकले जात असे, असा दावा प्रत्येक प्रकरणात इतिहासकार मान्य करत नाहीत.

Mughal queens

गुलाम बाजार आणि खरेदीची पद्धत

त्या काळात मध्य आशिया, पर्शिया आणि काही अरब प्रदेशांत गुलाम विक्रीची प्रथा अस्तित्वात होती. सुंदर, नृत्यकला किंवा संगीत जाणणाऱ्या महिलांना श्रीमंत सरदार आणि बादशाह विकत घेत असत. या महिलांना हरममध्ये नर्तिका, गायिका किंवा सेविका म्हणून स्थान दिले जात होते.

Mughal women

हरममध्ये प्रवेशासाठीचे नियम

हरममध्ये कोणालाही थेट प्रवेश मिळत नव्हता आणि त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था होती. महिलांची तपासणी, पार्श्वभूमी आणि त्यांची भूमिका ठरवूनच त्यांना आत प्रवेश दिला जात असे.

Royal marriages

महिलांचे वेगवेगळे दर्जे

हरममध्ये सर्व महिलांचा दर्जा समान नव्हता आणि त्यानुसार त्यांना सुविधा मिळत असत. बादशाहाची मुख्य बेगम, इतर पत्नी, दासी आणि सेविका यांच्यात स्पष्ट स्तर व्यवस्था होती.

Rajput alliances

स्वेच्छेनेही हरममध्ये प्रवेश

काही गरीब कुटुंबं आर्थिक फायद्यासाठी आपल्या मुलींना राजदरबारात पाठवत असत. हरममध्ये राहणाऱ्या महिलांना सुरक्षित निवास, अन्न, कपडे आणि काही वेळा मोठा मान-सन्मान मिळत असे.

Mughal palace

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा