Ankush Dhavre
छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार सात्विक आणि पौष्टिक पदार्थांनी समृद्ध होता. मांसाहार टाळून त्यांनी शाकाहारी आहारावर भर दिला.
त्या काळात पोषणमूल्यांनी भरपूर असलेल्या ज्वारी आणि बाजरीच्या भाकरींचा आहारात समावेश असे. या धान्यांमुळे उर्जा आणि सहनशक्ती वाढत असे.
छत्रपती शिवाजी महाराज तुपात शिजवलेले साधे वरण-भात, भाजी आणि दही यासारख्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करीत असत .
ताक, लोणी, तूप आणि दूध हे त्यांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग होते, ज्यामुळे त्यांची हाडे आणि स्नायू बळकट राहायचे.
लांब मोहिमा असताना हलकं आणि टिकाऊ अन्न गरजेचं होतं. त्यामुळे गूळ-शेंगदाणे, सुकामेवा, पोहे, आणि भाजक्या लाह्यांचा समावेश त्यांच्या आहारात असे.
हळद, आले, लसूण, लवंग, वेलदोडा आणि तुळशीसारख्या औषधी वनस्पतींमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत असे.
स्वच्छ पाणी आणि बेलसरबत, आमसूल सरबत यासारखी नैसर्गिक पेये प्राशन केलं जात असे, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळायचा.
संत्री, मोसंबी, डाळिंब, आंबा यासारखी फळे तसेच बदाम, अंजीर, खजूर यांचा आहारात समावेश होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्नाला अत्यंत पवित्र मानले आणि जड, तामसिक आणि अनारोग्यदायी पदार्थ टाळले. शत्रूच्या प्रदेशात कधीही बाहेरचे अन्न न खाण्याचे कटाक्षाने पालन केले जात असे.
"शिवचरित्र" – बाबासाहेब पुरंदरे