Surabhi Jayashree Jagdish
कमरेवर हात ठेवलेली मूर्ती डोळ्यासमोर आली की ती विठ्ठलाची असते. विठ्ठल हे एक विष्णूचं रूप मानण्यात येतं.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीच्या काठावर हे विठ्ठलाचं मंदीर वसलं आहे.
आता आषाढी एकादशी जवळ आली असून या दिवसासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात.
मात्र तुम्ही कधी विचार केलाय की, हे मंदिर १५० वर्षांपूर्वी कसं दिसत होतं.
या मंदिराचा इतिहास सुमारे ८०० वर्ष जुना आहे.
त्या काळात मंदिर हे हेमाडपंथी शैलीत बांधलेले होतं. हेमाडपंथी शैली म्हणजे काळ्या पाषाणाचा (दगडाचा) वापर करून केलेले बांधकाम, ज्यात विशिष्ट कोरीव काम आणि नक्षीकाम केलेले असे.
१५० वर्षांपूर्वीही पंढरपूरची वारी ही एक जुनी आणि मोठी भक्तिपूर्ण परंपरा होती. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असत. ही परंपरा ८०० वर्षांहून अधिक जुनी मानली जाते.