ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घुबडांना सामान्यतः मूर्ख मानले जाते. परंतु विज्ञानाच्या मते ते मूर्ख नाहीत. त्यांची जीवन जगण्याची पद्धत वेगळी आहे.
घुबड एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आवाज काढतात. पण त्यांची ओरडण्याची पद्धत खूपच वेगळी आहे.
जेव्हा घुबडांना मादी घुबडाशी संवाद साधायचा असतो. तेव्हा त्यांचा ओरडण्याचा आवाज वेगळा आणि सॅाफ्ट असतो.
विज्ञानाच्या मते, घुबडाच्या आवाजाच्या पॅटर्नवरुन समोरचा घुबड काय बोलायचा प्रयत्न करत आहे हे जोडीदाराला कळते.
घुबड आपला संदेश पोहोचवण्यासाठी विविध प्रकारचे आवाज काढत असतो. जसे की, शिट्टी वाजवणे, ओरडणे, कर्कश आवाज काढणे
वेगवेगळ्या घुबडांच्या प्रजातींचा आवाज वेगवेगळा असतो. काहींचा आवाज पातळ तर काहींचा जाड असतो.
जीव शास्त्रज्ञांच्या मते, घुबड त्यांच्या पंखाच्या हालचालींद्वारे देखील संदेश देण्याचा प्रयत्न करतात.