ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा टिव्ही चॅनल चित्रपट दाखवतात तेव्हा ते फक्त मनोरंजनाकरिता दाखवत नाही तर त्यातून कमाई सुध्दा करतात.
चित्रपटांदरम्यान मध्ये-मध्ये जो जाहिरात ब्रेक येतो त्याच जाहिरात ब्रेकमधून चॅनेलला सर्वाधिक उत्पन्न मिळते.
जाहिरात ब्रेक हा दर १०-१५ मिनिटांनी दिला जातो.
जर चित्रपट २.५ तासांचा असेल तर, जवळपास ४० ते ५० मिनिटे जाहिरात ब्रेक दिला जातो.
अश्यातच एक टीव्ही चॅनेल ५ चित्रपट दाखवून किती पैसे कमवते ते जाणून घेऊया.
एक टीव्ही चॅनेल ५ चित्रपट दाखवून १ ते ५ कोटी रुपये कमवू शकते.
हा दर चित्रपट किती लोकप्रिय आहे आणि चित्रपट बघण्याच्या वेळेवर अवलंबून असतो.
याशिवाय, डीटीएच आणि केबल कंपन्या देखील चॅनेलसाठी पैसे देतात कारण ते त्यांच्या पॅकेजमध्ये ते विकतात.