Manasvi Choudhary
अनेक महिलांना तासनतास साडी नेसून वावरणं अवघड वाटतं. अशावेळी नेमक काय करावे या सोप्या टिप्स जाणून घ्या.
हलक्या कापड्याच्या साड्या या तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि आरामदायी वाटू शकतात.
लिनन साडी नैसर्गिक धाग्यांपासून बनलेली असल्याने ती त्वचेसाठी खूप आरामदायी असते.
शिफॉन साडी इतकी हलकी असते की तुम्हाला ती नेसल्यासारखी वाटणारही नाही. लूक खूप सुंदर आणि स्टायलिश दिसतो.
जॉर्जेटला सुरकुत्या पडत नाहीत, त्यामुळे सकाळी नेसलेली साडी रात्रीपर्यंत तशीच राहते.
साध्या पेटीकोटऐवजी 'साडी शेपवेअर' वापरा. यामुळे साडीला छान फिनिशिंग मिळते आणि कंबरेला गाठीमुळे होणारा त्रास वाचतो.
खांद्यावरची पिन लावताना ती अगदी टोकावर न लावता थोडी मागच्या बाजूला लावा. यामुळे साडीचा भार खांद्यावर समान विभागला जातो आणि पदर पुढे येत नाही.