Manasvi Choudhary
हिवाळा सुरू होताच आपण कपाटातून स्वेटर, जॅकेट आणि शॉल्स हे लोकरीचे कपडे बाहेर काढतो. हे कपडे आपल्याला थंडीपासून वाचवतात, परंतु त्यांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास ते खूप लवकर खराब होतात,
लोकरीचे कपडे नीट धुतले नाहीकर त्याचा आकार बिघडतो किंवा ते श्रिंक होतात. लोकरिच्या कपड्यांचे धागे अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे ते नेहमी साध्या कपड्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने धुतले पाहिजेत.
लोकरीचा कोणताही कपडा धुण्यापूर्वी त्यावरील टॅग किंवा लेबल तपासा. त्यावर 'Dry Clean Only', 'Hand Wash Only' किंवा 'Machine Washable' असे स्पष्ट लिहिले असते. लेबलवरील सूचनेनुसारच कपडे धुवावेत.
लोकरीचे कपडे नेहमी थंड किंवा कोमट पाण्यात धुवावेत. गरम पाण्याचा वापर केल्याने लोकरीचे धागे श्रिंक होतात. लोकरीच्या कपड्यांसाठी असणारे लिक्विड डिटर्जंट वापरा. कपडे जास्त चोळू नका किंवा पिरगळू नका.
जर तुम्ही मशीनमध्ये कपडे धुणार असाल, तर मशीनमध्ये 'Wool' किंवा 'Gentle/Delicate' सायकल निवडा. पाण्याचे तापमान 'Cold' ठेवा आणि स्पिन स्पीड सर्वात कमी ठेवा, जेणेकरून कपड्यांवर ताण येणार नाही.
कपड्यांवर कोणताही डाग पडल्यास ताबडतोब कपडे धुवा. डागाच्या जागी थोडे लिक्विड डिटर्जंट लावून हलक्या हाताने स्वच्छ करा.
लोकरीचे कपडे कधीही दोरीवर टांगून सुकवू नका, यामुळे त्यांचा आकार बिघडतो. कपडे नेहमी सपाट जागी टॉवेलवर पसरवून सुकवावेत. तसेच थेट कडक उन्हात वाळवणे टाळावे.