Washing machine shoe cleaning: घाणेरडे-मळलेले शूज वॉशिंग मशीनमध्ये कसे धुवाल? ही आहे योग्य पद्धत

Surabhi Jayashree Jagdish

शूज मशीनमध्ये धुता येतात का?

शूज मशीनमध्ये टाकण्यापूर्वी त्यांच्या आतल्या बाजूला असलेले केअर लेबल तपासा. या लेबलवर शूज कसे स्वच्छ करावेत, याची माहिती दिलेली असते. कॅनव्हास, कॉटन, नायलॉन, पॉलिस्टर आणि मेश या कापडांपासून बनवलेले अनेक शूज मशीनमध्ये धुता येतात.

Shoe cleaning tips | saam tv

लेदर आणि साबरचे शूज

लेदर आणि साबरपासून बनवलेले शूज वॉशिंग मशीनमध्ये धुणं टाळा. पाणी आणि मशीनमुळे या शूजचं मटेरियल खराब होऊ शकतं आणि त्यांचा आकारही बदलू शकतो. तसंच सिक्विन, भरतकाम किंवा नाजूक सजावट असलेले शूज मशीनमध्ये धुवू नयेत.

How to clean dirty shoes | saam tv

मशीनमध्ये टाकण्यापूर्वी शूज स्वच्छ करा

शूज धुण्यापूर्वी त्यांचे लेस आणि सहज काढता येत असतील तर इनसोल बाहेर काढा. त्यानंतर मऊ ब्रश किंवा जुन्या टूथब्रशच्या मदतीने शूजवरील कोरडी माती, धूळ आणि इतर घाण काढून टाका. शूजचे तळवे आणि त्यावरील खाचा व्यवस्थित स्वच्छ करा, जेणेकरून मशीनमध्ये जास्त घाण पसरणार नाही.

Best way to wash sneakers | saam tv

वॉशिंग मशीनची योग्य सेटिंग निवडा

शूज धुण्यासाठी मशीनमध्ये जेंटल किंवा डेलिकेट सायकल निवडा. पाण्याचे तापमान थंड ठेवा. कारण गरम पाण्यामुळे शूजचा रंग, आकार आणि चिकटवलेले भाग खराब होण्याची शक्यता असते. शूज धुण्यासाठी जास्त डिटर्जंट वापरू नका, तर थोडेसे सौम्य लिक्विड डिटर्जंट वापरा.

Machine washable shoes | saam tv

लेस आणि इनसोल

शूज मशीनमध्ये धुत असताना त्यांचे लेस आणि इनसोल वेगळे स्वच्छ करू शकता. लेस मेश बॅगमध्ये ठेवून धुता येतात किंवा सौम्य डिटर्जंट मिसळलेल्या कोमट पाण्यात भिजवता येतात. त्यानंतर लेस हलक्या हाताने चोळून स्वच्छ पाण्याने धुवा.

How to wash sports shoes | saam tv

इनसोल पूर्णपणे सुकल्यानंतरच शूजमध्ये ठेवा

काही इनसोल मशीनमध्ये धुता येतात, तर काही फक्त हाताने स्वच्छ करावे लागतात. त्यामुळे इनसोलसोबत दिलेल्या स्वच्छतेच्या सूचना आधी तपासा आणि हाताने धुवायचे असल्यास मऊ कापड व सौम्य साबण वापरा. लेस आणि इनसोल पूर्णपणे सुकल्यानंतरच ते पुन्हा शूजमध्ये बसवा.

How to clean white shoes | saam tv

Gas Stove and Sink Distance: गॅस शेगडी आणि सिंकमध्ये किती अंतर असावं?

Gas Stove and Sink Distance | saam tv
येथे क्लिक करा