Manasvi Choudhary
आजकाल धावपळीच्या या जीवनात प्रत्येकाला चेहरा सुंदर दिसावा असं वाटत असते यासाठी महागडे केमिकलयु्क्त प्रोडक्ट्सचा वापर करतात.
मात्र यामुळे चेहरा देखील खराब होऊ शकतो यासाठी आज आम्ही घरगुती टोमॅटोने चेहरा कसा उजळेल हे सांगणार आहोत.
टोमॅटो आणि कोरफड हे चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. टोमॅटोचा घरगुती फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावा.
टोमॅटो आणि कोरफडचा फेसपॅक चेहऱ्यावरील टॅन कमी करते आणि चेहरा उजळवते.
टोमॅटोचा फेसपॅक बनवण्यासाठी टोमॅटो, कोरफड जेल, मध, हळद आणि बेसन हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोची पेस्ट करा. या पेस्टमध्ये कोरफड रस मिक्स करा. नंतर त्यात मध, हळद आणि बेसन हे मिश्रण एकत्र करा म्हणजे टोमॅटोचा फेसपॅक तयार होईल.
चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. नंतर चेहऱ्यावर टोमॅटोचा फेस पॅक लावा. नंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा चेहऱ्यावर मॉईश्चरायझर लावा.
आठवड्यातून दोन वेळा तुम्ही टोमॅटोचा फेसपॅक लावल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.