Chana Koliwada Recipe: स्टार्टर रेसिपी, कुरकुरीत चना कोळीवाडा घरी कसा बनवायचा?

Manasvi Choudhary

चना कोळीवाडा रेसिपी

हॉटेल, ढाब्यावर गेल्यावर स्टार्टर म्हणून बरेचजण चना कोळीवाडा ऑर्डर करतात. कुरकुरीत चना कोळीवाडा टाईमपास म्हणून खायला चमचमीत लागतो.

Chana Koliwada

सोपी रेसिपी

घरी देखील तुम्ही सोप्या पद्धतीने चना कोळीवाडा ही रेसिपी बनवू शकता.

Chana Koliwada

साहित्य

चना कोळीवाडा बनवण्यासाठी काबुली चणे, मसाला, हळद, धना पावडर, जिरे पावडर, आलं- लसूण पेस्ट, मीठ, कॉर्न फ्लोअर, तांदळाचे पीठ , बेसन आणि लसूण हे साहित्य एकत्र करा.

Chana Koliwada

काबुली चने स्वच्छ धुवा

सर्वात आधी काबुली चने स्वच्छ धुवून ५ ते ६ तास आधी पाण्यात भिजत घाला म्हणजे ते चांगले फुलतील.

Chana Koliwada

चणे उकडून घ्या

तर गॅसवर कुकरमध्ये काबुली चणे उकडून घ्या त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी मिक्स करा.

Chana Koliwada

मिश्रण तयार करा

एका भांड्यात हळद, धना पावडर, मसाला, कॉर्न फ्लोअर, तांदळाचे पीठ, बेसन, जिरा पावडर, मीठ, आलं - लसूण, पेस्ट हे मिश्रण एकत्र करा. यात उकडलेले काबुली चणे मिक्स करा.

Chana Koliwada

काबुली चने तळून घ्या

मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसवर कढईत गरम तेलामध्ये काबुली चणे तळून घ्या.

Chana Koliwada

चना कोळीवाडा तयार

कुरकुरीत फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये चणे काढा. अशाप्रकारे घरच्य घरी चना कोळीवाडा तयार होईल.

Chana Koliwada

NEXT: South Indian Sambar Recipe: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल सांबार आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

South Indian Sambar Recipe
येथे क्लिक करा..