South Indian Sambar Recipe: अस्सल साऊथ इंडियन स्टाईल सांबार आता बनवा घरीच, ही आहे सोपी रेसिपी

Manasvi Choudhary

साऊथ इंडियन पदार्थ

सांबार म्हटलं की नजरेसमोर इडली, डोसा, मेदूवडा हे चित्र येतच. साऊथ इंडियन हा प्रसिद्ध पदार्थ आता सगळीकडे लोकप्रिय झालाय.

South Indian Sambar | SAAM TV

सांबार

घराघरांत साऊथ इंडियन इडली, मेदूवडा हे पदार्थ महिला बनवतात. मात्र साऊथ इंडियन स्टाईल सांबार आणि चटणीशिवाय खायला मज्जाच येत नाही.

South Indian Sambar Recipe

सोपी रेसिपी

साऊथ इंडियन स्टाईल सांबर घरी बनवण्याची रेसिपी देखील सोपी आहे. सांबार बनवण्यासाठी तूर डाळ, टोमॅटो, कांदा, शेवग्याची शेंग, कढीपत्ता, चिंच, हळद, मोहरी, मसाला, सांबर मसाला, लाल मिरची, मीठ हे साहित्य एकत्र करा.

South Indian Sambar Recipe

मिश्रण तयार करा

सर्वात सांबर बनवण्यासाठी एका डिशमध्ये चिंच पाण्यात भिजत घाला. गॅसवर कुकरमध्ये तूर डाळ स्वच्छ धुवून उकडून घ्या. यामध्ये तुम्हा बारीक चिरलेला टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा देखील घालू शकता.

South Indian Sambar Recipe

भाज्या बारीक करा

मिश्रणात थोडेसे पाणी, बारीक चिरलेल्या भाज्या आणि चिंचाचे पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण बंद करा. ३ ते ४ शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करा. कुकर थंड झाल्यानंतर एका पातेल्यात मिश्रण काढा.

South Indian Sambar Recipe

फोडणी द्या

गॅसवर एका भांड्यात डाळीला फोडण्यासाठी तेल गरम करा नंतर त्यात मोहरी, हिंग आण कढीपत्ता मिक्स करा.

Fodni

गरमागरम साबांर तयार

नंतर यात उकडलेले मिश्रण मिक्स करून सांबार तयार करा अशाप्रकारे घरच्या घरी सांबार तयार होईल.

South Indian Sambar Recipe

next: Red Vs Black Clay Pot: लाल की काळा, कोणत्या माठात पाणी राहील थंड?

येथे क्लिक करा...