Saam Tv
निरोगी त्वचेसाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे पिंपल्सच्या समस्या उद्भवतात.
बाजारात अनेक प्रोडक्टस आढळतात ज्यामुळे तुमच्या त्वचेवर अनेक समस्या उद्भवतात.
टॅनिंगचा त्रास दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील हळद आणि तुरटीचा वापर करा.
हळद आणि तुरटी क्लिंजिंग एजंट आहेत त्यामुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
हळद-तुरटीचा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम तुरटीची पावडर तयार करा आणि त्यात हळद मिक्स करा.
त्यानंतर त्यामध्ये गुलाबपाणी आणि कोरफडजेल मिक्स करा आणि घट्ट पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटे लावा आणि स्क्रब करा आणि थंड पाण्यानी चेहरा स्वच्छ धुवा यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.