Priya More
भारतामधील अनेक मोठ-मोठ्या रेल्वे स्थानकांवर फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध आहेत.
मुंबईसारख्या शहरातील प्रत्येक रेल्वे स्थानकांवर देखील फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध आहेत.
रेल्वे स्टेशनवर फ्री वाय-फाय सुविधा मिळते पण अनेकांना ती कशी वापरायची हेच माहिती नसते.
रेल्वे स्थानकावरील फ्री वाय-फाय सुविधा वापरण्यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय सेटिंगमध्ये जा.
नंतर स्मार्टफोनमध्ये तुमच्या आसपासच्या वाय-फायची लिस्ट चेक करा. त्यामध्ये तुम्हाला Railwire Network हा पर्याय दिसेल तो सिलेक्ट करा.
रेल्वेवायर नेटवर्कला कनेक्ट केल्यानंतर तुम्ही स्मार्टफोनमधील ब्राउजरमध्ये जाऊन railwire.co.in वर जा.
त्यानंतर रेल्वेवायरच्या वेबसाइटवर तुम्हाला १० अंकी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
तुम्ही टाकलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तुमच्या स्मार्टफोनवर आलेल्या ओटीपीला पासवर्ड म्हणून वापर करा.
मिळालेल्या पासवर्डच्या माध्यमातून तुम्ही रेल्वेवायरची फ्री वाय-पाय सुविधाचा वापर करू शकता.