Priya More
ताडगोळे म्हणजेच आईस अॅपल खाणं अनेकांना आवडते. ताडगोळे चवीला गोड, रसदार आणि चविष्ट असतात.
ताडगोळ्यांमध्ये खनिजे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्व आढळतात.
वजन कमी करण्यासाठी ताडगोळे उपयुक्त आहेत. ताडगोळे खाल्ल्यामुळे भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी ताडगोळे खूपच फायदेशीर आहेत. यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पोटामध्ये सतत जळजळ होत असेल तर ताडगोळे खा. यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि थकवा जाणवत नाही.
ताडगोळे खाल्ल्यामुळे चेहऱ्यावरील पूरळ दूर होतात., टॅनिंगमुळे त्वचा काळी पडली असेल तर ताडगोळे खाल्ल्याने काळेपणा दूर होईल.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ताडगोळे फायदेशर ठरतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते तसंच पोटात गच्चपणा जाणवत नाही.
तुम्हाला जर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर ताडगोळे खा. त्यामुळे ही समस्या दूर होईल.
डिहायड्रेशनची समस्या असणाऱ्यांनी ताडगोळे खावे. यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते आणि पाण्याची कमतरता जाणवत नाही.