Manasvi Choudhary
डोळ्यावर काकडी ठेवताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल मात्र डोळ्यांवर काकडी ठेवण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर काकडी ठेवणे फायदेशीर मानले जाते.
काकडीमध्ये दाहक- विरोधी गुणधर्म असतात जे डोळ्यांमधील सूज कमी करतात.
काकडी थंड असते यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
काकडी डोळ्यांवर ठेवल्याने आरामदायी वाटते. ताजी काकडी डोळ्यांवर ठेवल्याने जळजळ होत नाही.
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते यामुळे त्वचा हायड्रेट राहते. डोळ्यांवर काकडी ठेवल्याने शांत झोप लागते.
काकडी धुवून तिचे गोलाकार तुकडे करून डोळ्यांवर ठेवावी.