Manasvi Choudhary
कोरफड आयुर्वेदिक मानले जाते. केस, त्वचा यावर घरगुती उपाय म्हणून कोरफड वापरतात. चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे अनेक फायदे आहेत.
हिवाळ्यात कोरफड लावल्याने त्वचेला नेमका काय फायदा होतो हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते यामुळे त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी कोरफडचा रस चेहऱ्यावर लावा.
कोरफडमध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवरील सूज, लालसरपणा कमी होतो.
कोरफडमध्ये अँटी-ऑक्सिडन्ट्स असतात जे त्वचेतील कोलेजन निर्माण वाढवतात त्वचा चमकदार होते.
कोरफड चेहऱ्याला लावल्याने मुरूम देखील कमी होतात. कोरफड त्वचेला स्वच्छ ठेवते.
हिवाळ्यात आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला कोरफड लावा यामुळे फायदा होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.