Manasvi Choudhary
खोबरेल तेल केसांसठी फायदेशीर आहे. केसांना खोबरेल तेल लावल्याने केसांचा वाढ होते.
मात्र केसांना खोबरेल तेल लावताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
बाटलीतून तेल लावण्यापेक्षा तेल थोडे कोमट करून केसांना लावणे जास्त फायदेशीर असते.
सर्व केसांना एकाच वेळी तेल लावण्याऐवजी, केसांचे छोटे छोटे विभाग करा. यामुळे प्रत्येक केसाला आणि टाळूच्या प्रत्येक भागाला तेल व्यवस्थित लागते.
हाताच्या तळव्याने तेल घासण्यापेक्षा बोटांनी केसांच्या टाळूला मसाज करा.
केसांच्या टोकांना तेल लावल्यामुळे दुभंगलेले केस कमी होतात आणि केस खालून तुटत नाहीत.
जर तुमचे केस खूप कोरडे असतील, तर रात्री तेल लावून सकाळी केस धुवा.