Manasvi Choudhary
केसामध्ये कोंडा होणे या समस्येने महिला व पुरूष सर्वच त्रस्त आहेत.
केसांमधील कोंडा घालवण्यासाठी केवळ महागडे शॅम्पू नाहीतर तुम्ही स्वयंपाकघरातील नैसर्गिक गोष्टी वापरू शकता.
लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते जे कोंडा मुळापासून काढण्यास मदत करते. खोबरेल तेलामध्ये लिंबू मिक्स करून केसांची मसाज करा.
कोरफडमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे टाळूला थंडावा देतात आणि खाज कमी करतात. कोरफडचा रस करून तुम्ही केसांना लावा
कांद्यामध्ये सल्फर असते जे बुरशीजन्य संसर्ग रोखते. कांद्याचा रस काढून कापसाच्या साहाय्याने टाळूवर लावा. २० मिनिटांनी केस धुवा
कापूर टाळूवरील संसर्ग कमी करण्यास मदत करतो. खोबरेल तेलात थोडा कापूर विरघळवून ते तेल केसांना लावा. यामुळे थंडावा मिळतो आणि कोंडा कमी होतो.
कडुनिंब हे नैसर्गिकरित्या केसांसाठी फायदेशीर आहे. कडुनिंबाचा पाला पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवा किंवा पानांची पेस्ट हेअर मास्क म्हणून वापरा.
दुसऱ्याचा कंगवा वापरू नका आणि आपला कंगवा नियमित गरम पाण्याने स्वच्छ करा.