Manasvi Choudhary
कोरफडचे औषधी गुणधर्म आहेत. केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफडचा रस फायदेशीर आहे.
लांब आणि दाट केस हवे असतील तर तुम्ही घरच्या घरी सोपा उपाय करून पाहा.
कोरफडचा रस आणि खोबरेल तेल मिक्स करून हे तेल कोमट करून केसांना लावा यामुळे केसांना फायदा होईल.
रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळांशी हलक्या हाताने मसाज करा आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुवा.
कोरफड तेल आणि एरंडेल तेल मिक्स करून केसांच्या टोकांना लावल्याने केस तुटत नाही आणि मुळापासून नवीन केस येतील.
कांद्याचा रस आणि कोरफड रस एकत्र करून केसांना लावा यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांची मुळे अत्यंत घट्ट होतात.
वरील सर्व उपाय आठवड्यातून तीन वेळा केल्याने केसांच्या वाढीसाठी थेट फायदा होईल.