Manasvi Choudhary
आजकाल केसांच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत. केस गळणे, केसात कोंडा होणे, लवकरच केस पांढरे होणे या समस्या भेडसावत आहेत.
केवळ पार्लरमध्ये जाऊन नाही तर घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने केसांची काळजी घ्या.
सिल्की आणि शाईनी केसांसाठी घरच्या घरी हेअर स्पा करा म्हणजे केसांना मुळापासून पोषण मिळेल.
हेअर स्पा करण्यापूर्वी केसांना खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑईल कोमट करून केसांना लावा आणि मसाज करा.
त्यानंतर एक सुती कपडा गरम पाण्यात भिजवा आणि केसांभोवती १० ते १५ मिनिटे गुंडाळून ठेवा. म्हणजे केसांना तेल आतपर्यंत जाते.
यानंतर तुम्ही केसांना शॅम्पूने कोमट पाण्याने धुवा यामुळे केसांवरील अतिरिक्त तेल आणि साचलेली घाण निघून जाते.
केसांना केळी, दही, मध आणि कोरफड रस याचा हेअर मास्क लावा म्हणजे केसांना चमक येईल.
यानंतर पुन्हा केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा केसांना शाम्पू लावू नका यामुळे केस मऊ होतात.
हा हेअर स्पा तुम्ही महिन्यातून दोन वेळा करावा म्हणजे केसांना फायदा होईल.