ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच अनेक संसर्गाच्या आजारांचा धोका वाढतो.
पावसाळ्यात तुमच्या घरातील नवजात बाळाची विशेष काळजी ध्यावी लागते.
नवजात बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यामुळे त्यांना लगेच संसर्ग होऊ शकतो.
पावसाळ्यात घराची स्वच्छता राखणे महत्त्वाची असते त्यामुळे घरामध्ये माश्या फिरत नाही आणि बाळाचे आरोग्य निरोगी राहाते.
नवजात बाळाला दररोज कोमट पाण्याने आंघोळ घाला यामुळे बाळाच्या शरीरावरील विषाणू निघून जातात.
पावसाळ्यात तुमच्या नवजात बाळाला स्तनपान करणं आवश्यक आहे. यामुळे बाळाच्या शरीराला पोषण मिळते.
पावसाळ्यात तुमच्या नवजात बाळाला हलके आणि सुती कपडे घाला
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.