ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कडाक्याचे ऊन, धूळ आणि वाढते प्रदूषण यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात.
उन्हाळ्यात सेंसिटिव्ह स्कीनची काळजी कशी घ्यावी, यासाठी कोणते उपा. करावे, जाणून घ्या.
चेहरा स्वच्छ धुवा. तुमच्या स्कीन टाइपनुसार, फेस वॉश निवडा आणि दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा.
चेहरा धुतल्यानंतर कोरडा करा. आणि मॉइश्चरायजर लावा.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर सनस्क्रिन लावायला विसरु नका. सनस्क्रिनमुळे सनबर्न आणि टॅनिंग सारख्या समस्यापासून आराम मिळतो.
चेहऱ्याला थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी चेहऱ्यावर लावा.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर होणारी जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी गुलाबजल लावा.