ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या महाराष्ट्रासह सर्वत्र जोरदार पावसाळा सुरुवात झालेली आहे.
पाऊस सुरु होताच वीज पडून व्यक्तींचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडतान दिसून येत आहेत.
चला तर पाहूयात पावसाळ्यात वीज कोसळताना स्वत:ला कसं वाचवाल ?
ज्या वेळेस वीजासह जोरदार पाऊस पडत असल्यास तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी इमारतीच्या छताखाली आसरा घेऊ शकता.
कधीही वीजांसह जोरदार पाऊस पडत असल्यास वीजेच्या उपकरणांपासून लांब रहा.
लोखंडी खिडक्यांपासून स्वत:ला लांब ठेवावे.
जोरदार वीजांसह पाऊस पडत असताना आसरा घेण्यासाठी झाड किंवा गुरांचा गोठा ही ठिकाण निवडू नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.