ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टोमॅटो विविध पदार्थामध्ये वापरले जातात म्हणून ते ताजे ठेवणे महत्वाचे आहे.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नका कारण कमी तापमानामुळे त्यांची चव आणि पोत खराब होऊ शकते.
टोमॅटो जास्त काळ ताजे राहण्यासाठी त्यांना खोलीच्या तपमानावर देठाची बाजू खाली करुन साठवा.
पिकलेल्या टोमॅटोंना वेगळे ठेवा कारण की, पिकलेले टोमॅटो बाकी सगळ्या टोमॅटोंना लवकर पिकवू शकतात.
टोमॅटोंना पेपर बॅगमध्ये ठेवल्यास त्यांचा नरमपणा कायम राहतो आणि अधिक काळासाठी फ्रेश राहण्यास मदत होते.
जास्त प्रमाणात टोमॅटो खरेदी केल्यास, टोमॅटोची प्युरी किंवा टोमॅटो सॉस बनवून ठेवा.
टोमॅटो लवकर खराब होऊ नयेत म्हणून त्यांना सूर्यप्रकाशापासून दूर आणि हवेशीर ठिकाणी ठेवा.