Ginger Garlic Paste: आलं-लसूण पेस्ट लवकर खराब होते? मग वापरा 'या' सोप्या टिप्स अन् महिनाभरासाठी साठवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आलं-लसूण पेस्ट

अनेक भारतीय पदार्थांमध्ये आलं लसूण पेस्ट वापरली जाते. यामुळे जेवणाची चव वाढते.

paste | yandex

आलं-लसूण पेस्ट कसे साठवायचे?

दररोज आलं लसूण पेस्ट बनवण्यात वेळ जातो, यासाठी तुम्ही या सोप्या टिप्स वापरुन महिनाभरासाठी आलं लसूण पेस्ट साठवून ठेवू शकता, जाणून घ्या.

paste | yandex

तेलाचा वापर करा

आलं -लसूण पेस्ट जास्त काळ साठवण्यासाठी तुम्ही तेल वापरू शकता. यामध्ये थोडेसे मोहरीचे तेल किंवा रिफाइंड तेल घाला. यामुळे पेस्ट लवकर काळी पडणार नाही.

paste | yandex

हवाबंद डबा आणि रेफ्रिजरेटर

आलं-लसूण ही पेस्ट नेहमी हवाबंद काचेच्या भांड्यात ठेवावी. तसेच, प्रत्येक वेळी वेगळ्या आणि स्वच्छ चमच्याने पेस्ट बाहेर काढा. पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास हे २ ते ३ आठवडे टिकू शकते.

paste | yandex

मीठ घाला

तुम्ही आलं-लसूण पेस्ट बनवताना त्यात थोडे मीठ घाला. हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करेल. यामुळे बॅक्टेरिया वाढण्याचा धोका देखील कमी होईल आणि पेस्ट बराच काळ ताजी राहील.

paste | yandex

पेस्टचे आईस क्यूब

तुम्ही आलं -लसूण पेस्टचे क्यूब बनवून ते साठवू शकता. पेस्ट बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून फ्रिजरमध्ये सेट करा. जेव्हा गरज असेल तेव्हा एक क्यूब काढून वापरा.

paste | yandex

स्वच्छतेची काळजी घ्या

सर्वात महत्वाची टीप म्हणजे पेस्ट बनवताना, मिक्सर-ग्राइंडर, हात, चमचा आणि कंटेनर पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे असले पाहिजेत. थोडासा ओलावा किंवा घाण देखील पेस्ट लवकर खराब करू शकते.

paste | Saam Tv

NEXT: हाडांच्या कॅन्सरची लक्षणे कोणती? हाडांचा कॅन्सर का होतो?

Bones | freepik
येथे क्लिक करा